धूम-३ : अमिरची जबरदस्त अॅक्शन आणि कॉमेडीचा तडका, ‘Dhoom 3’ Review: An Aamir Khan film all the way

Review: धूम-३ : अमिरची जबरदस्त अॅक्शन आणि कॉमेडीचा तडका

Review: धूम-३ : अमिरची जबरदस्त अॅक्शन आणि कॉमेडीचा तडका
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अमिर खानचा धूम-३ सिनेमा आज रिलीज झाला. धूम सीरीजमधील हा तिसरा सिनेमा आहे. विजय कृष्ण आचार्य याचा धूम-३ हा सिनेमा आहे. यामध्ये प्रमुख भूमिका अमिर खान, अभिषेक बच्चन, कतरिना कैफ, उदय चोप्रा, जॉकी श्रॉफ यांनी निभावल्या आहेत. मात्र, सा सिनेमात अमिर खान उठून दिसतो आहे. त्याचा अभिनय जबरदस्त आहे. त्यांने संपूर्ण सिनेमात अन्य कलाकारांवर सहज मात केली आहे. या सिनेमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे स्टंट आहे. स्टंटमुळे हा सिनेमा एकदम मस्त वाटत आहेत. या सिनेमा अमिर खानभोवतीच फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अन्य कलाकारांचे महत्व कमी वाटत आहे.

धूम-३ची कथा जादूगार इक्बाल (जॅकी श्रॉफ) याच्या शिकागोमधील सर्कसवर आधारित आहे. त्यानेच सिनेमाची सुरूवात होती. मात्र, ही सर्कस फ्लॉप होती. बॅंकेचे कर्ज फेडायचे या विवंचनेत इक्बाल खचून जातो. सर्कस वाचविण्यासाठी प्रयत्न केला जातो. मात्र, यात यश येत नाही. बॅंक कर्जामुळे बाका प्रसंग आल्यामुळे शेवटी इक्बाल आत्महत्या करतो. इक्बालचा मुलगा साहिर म्हणजेच अमिर खान याचा सूड घेण्यासाठी पेटून उठतो. वडिलांचे जे सर्कसचे स्वप्न होते ते पूर्ण करण्यासाठी अमिर खान पेटून उठतो.

पुन्हा सर्कस सुरू करण्यासाठी वाटेल ते करण्याची साहिरची तयारी असते. त्यासाठी तो पर्याय निवडतो तो म्हणजे बॅंक लुटण्याची. बॅंकेच्या प्रत्येक शाखेत चोरी करण्यास सुरूवात करतो. मात्र, साहिर म्हणजे अमिर खानला कोणीही पकडू शकत नाही. यापाठीमागे मोठी स्टोरी आहे. हे राज या सिनेमातून दाखविण्यात आले आहे. बाईकस्वार धूम स्टाईलने जाणारा अमिर पडद्यावर पाहणे चांगले ठरेल आणि पडद्यावर नेमकी काय स्टोरी आहे, ते पाहिल्यावर समजेल.

अभियनाचा विचाल केला तर अमिर खानने सर्वांवर मात केलेय. पुन्हा एकदा अमिरने मिस्टर परफेक्शनिस्ट असल्याचे दाखवून दिले आहे. अभिषेक बच्चनला जास्त काही अभियनात दाखविता आले नाही. अभिषेक आणि कतरिनाचा अभिनय सामान्य आहे. मात्र, इक्बालची जी भूमिका जॅकी श्रॉफने बजावली त्याला तोड नाही. तर धूम सीरीजमधील `धूम मचाए धूम` हे गाणं जबरदस्त वाटते. यात कतरिनाने चांगला डान्स केलाय.

धूम-३ची गाणी आणि संगीत लाजवाब आहे. `धूम मचाए धूम` हे गाणं खूपच पॉप्युलर आहे. तर मलंग या गाण्यावर ५ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहे. त्यामुळे टेक्नोलॉजीचा कसा वापर केलाय याचा अंदाज येतो. हा सिनेमा १२५ कोटी रूपयांचा आहे. ४५०० सिनेमा गृहात भारतात तर परदेशात ७ थिएटरमध्ये धूम-३ सिनेमा रिलीज झालाय. यश राज फिल्मचा हा सिनेमा आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, December 20, 2013, 17:32


comments powered by Disqus