`धूम-३` चं धमाकेदार ट्रेलर, ‘Dhoom 3’ teaser : Watch Aamir Khan in a brand new avatar!

`धूम-३` चं धमाकेदार ट्रेलर

`धूम-३` चं धमाकेदार ट्रेलर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

यशराज फिल्म्सची सर्वाधिक चर्चित निर्मित असणारा धूम ३ आता रिलीज च्या मार्गावर आहे. धूम ३ चा पहिला प्रोमो लाँच करण्यात आला आहे. धूम सिरीजमधील तिसऱ्या भागात आमिर खान हाय टेक खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

आमिर खानच्या बाईक स्टंट्ससोबत अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा हे आधीच्या धूम सिरीजमधील बायकर पोलीस पाहायला मिळणार आहेत. याशिवाय कतरिना कैफचा हॉट अंदाजही यात पाहायला मिळणार आहे.



या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आमिर खान जीवघेणे स्टंट्स करताना दिसतोय. या सिनेमामुळे कतरिनाच्या नावावर आणखी एक धमाकेदार हिट सिनेमा येण्याची शक्यता आहे. ट्रेलरची सुरूवात आमिर खान म्हणत असलेल्या शायरीने झाली आहे.

बंदे है हम उसके हमपे किसका जोर
उम्मीदों का सूरज निकले चारो ओर
इरादे है पौलादी हिम्मती हर कदम
अपने हाथों किस्मत लिखने आज चले है हम...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.



First Published: Thursday, September 5, 2013, 19:29


comments powered by Disqus