धूम ३ बघण्यासाठी ५०० रु.चा फटका.....Dhoom 3 to view the Rs. 500 of groovy .....

धूम ३ बघण्यासाठी ५०० रु.चा फटका...

धूम ३ बघण्यासाठी ५०० रु.चा फटका...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

यशराज फिल्मची धूम ३ या चित्रपटाची उत्सुकता दर्शकांमध्ये दिसून येत आहे. हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शीत होणार आहे. यशराजचा हा सर्वात मोठा चित्रपट म्हणून चर्चा रंगते आहे. मल्टिप्लेक्समध्ये फक्त एक तिकीट हे तब्बल ५०० रुपयाला विकणे असे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे हा चित्रपट दर्शकांना पाहावयास खूप महाग पडू शकते. चित्रपटाची लोकप्रियता आणि चित्रपटावरील खर्च बघून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तिकीट वाढ करण्यात आली आहे.

धूम ३ हा चित्रपट क्रिसमसच्या मुहुर्तावर प्रेक्षकांसाठी प्रदर्शीत होणार आहे. अमिर खानचा हा पहिला चित्रपट असेल जो ‘आईमैक्स` फॉर्मटमध्ये प्रदर्शीत होत आहे. या चित्रपटामध्ये अमिर खान हा नकारात्मक भुमिका करताना दिसणार आहे.

धूम हा चित्रपट २००४ मध्ये आणि धूम २ हा २००६ मध्ये प्रदर्शीत झाले होते. धूम ३ मध्ये अमिर खान आणि कतिरना कैफ बरोबरच अभिषेक बच्चन, उद्य चोपडा हे ही महत्त्वपूर्ण भुमिका करताना दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागलेली आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 29, 2013, 17:03


comments powered by Disqus