`दबंग` स्टार सलमानची `धूम-4`मधून धूम, Dhoom -4 Dhoom fiercely Machaange `Dabangg` Salman?

`दबंग` स्टार सलमानची `धूम-4`मधून धूम

`दबंग` स्टार सलमानची `धूम-4`मधून धूम
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

धूम सीरिज आणि सलमान खानच्या चाहत्यांना एक चांगली बातमी आहे. धूम-4मध्ये सलमान दिसणार आहे. धूम-3ला चांगले यश मिळाले. त्यामुळे धूम-4 सिनेमा रसिकांसाठी एक चांगली बाब असेल.

धूम सीरीजमध्ये हिरो पेक्षा व्हिलन याचीच चर्चा असते. त्याच्या भोवती सिनेमा फिरत असतो. व्हिलनलाच जास्त महत्व दिले जात आहे. जॉन अब्राहम, हृतिक रोशन आणि आमिर खान यांच्या व्यक्तीरेखा चांगल्या राहिल्या आहेत. त्यामुळे बॉलिवूडमधील टॉपचे हिरो धूममधील भूमिका नाकारण्याचे धाडस करीत नाहीत.

धूम-4मध्ये सलमान खान असणार आहे. मात्र, या बाबतची अधिकृत घोषणा होण्याची बाकी आहे. त्यामुळे धूम-4मध्ये सलमानची काय जादू चालणार यांची उत्सुकता आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 27, 2014, 11:25


comments powered by Disqus