Last Updated: Monday, May 13, 2013, 17:07
www.24taas.com, मुंबई बॉलीवूड अभिनेत्री अंतरा माळी हिचे वडील आणि प्रसिद्ध फोटोग्राफर जगदीश माळी यांचं आज मुंबईत सकाळी सव्वाअकराच्या सुमारास निधन झालंय.
गेली अनेक वर्ष त्यांना लिव्हरचा आजार होता. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.गेली अनेक वर्ष ते नैराश्यानं ग्रासले होते. मध्यंतरी बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांना मदतीचा हात दिला.
मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.माळी हे गेल्या अनेक वर्षांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते.
यावर्षी जानेवारी महिन्यात मुंबईतील रस्त्यावर फिरताना बिग-बॉस स्टार मिंक ब्रार हिला ते आढळले होते. त्यावेळी तिने अंतरा माळी हिच्याशी संपर्क साधला होता. मात्र, तिने मदत करण्यास नकार दिल्यानंतर अभिनेता सलमान खानने त्यांची सर्व व्यवस्था केली होती.
चित्रपट निर्माते अशोक पंडीत यांनी ट्विटरवरून माळी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. माळी हे गेल्या अनेक वर्षांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते. माळी यांनी ऐशीच्या दशकामध्ये आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. रेखा, शबाना आझमी, करीना कपूर, अनुपम खेर, ओम पुरी, इरफान खान अशा प्रसिद्ध कलाकारांसह त्यांनी काम केले आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 13, 2013, 15:28