सलमानशी मतभेद दूर होतील, पण...: शाहरुख, Differences with Salman won`t be resolved publicly: SRK

सलमानशी मतभेद दूर होतील, पण...: शाहरुख

सलमानशी मतभेद दूर होतील, पण...: शाहरुख

www.24taas.com, नवी दिल्ली
अभिनेता सलमान खान यांच्याशी बऱ्याच वर्षांपासून झालेले मतभेद कोणताही चित्रपट, अभिनेत्री किंवा कोणताही निर्माता दूर करू शकत नाही आणि हे मतभेद सार्वजनिक कार्यक्रमातही दूर होऊ शकत नाही, असे शाहरुख खानने स्पष्ट केले आहे. आमच्यातील मतभेद है वैयक्तीक पातळीवर झाले आहेत, ते आम्हीच दूर करू शकतो.

‘करन-अर्जुन’, कुछ कुछ होता है आणि इतर चित्रपटात काम केलेल्या या दोघा अभिनेत्यांमध्ये २००८ला अभिनेत्री कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत भांडण झाले होते. तेव्हा कतरिना सलमानची गर्लफ्रेंड असल्याची चर्चा होती.

दरम्यान, कतरिनाने दोन्ही खानांना घेऊन एक चित्रपट बनविण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु याला सलमानने नकार दिला होता. शुक्रवारी शाहरुख ‘हिंदुस्तान टाइम्स लीडरशीप समिट २०१२मध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने हे सांगितले. तो म्हणाला, सलमान आणि माझ्यातील मतभेद है वैयक्तिक पातळीवरचे आहेत. हे मतभेद चारवर्षांपूर्वीचे नाही तर त्यापेक्षाही अधिक जुने आहेत.

सलमान आणि माझे संबंध २० वर्षांपेक्षा अधिक काळापासूनचे आहेत, बॉलिवुडमध्ये पाय ठेवला तेव्हापासून सलमानच्या कुटुंबाचा मी आदर राखून आहे. या कुटुंबाने मला खूप प्रेम दिले. सलमानच्या घरून मला जे प्रेम मिळाले त्याचा मी कधी अनादर करू शकत नाही. आम्ही एकत्रच मोठे झालो आहोत, असे शाहरुखने यावेळी सांगितले.

सलमान आणि माझ्यामध्ये काही गोष्टींत साम्य आहेत तर काही गोष्टींकडे पाहण्याचा आमचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा असल्याचे शाहरुखने सांगितले.

आमच्या सध्या मतभेद आहेत. एकवेळ अशी येईल की हे मतभेद दूर होतील, पण हे मतभेद सार्वजनिक कार्यक्रमात दूर होणार नाहीत, कारण तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे असल्याचे शाहरुखने स्पष्ट केले.

First Published: Saturday, November 17, 2012, 00:07


comments powered by Disqus