Last Updated: Wednesday, September 25, 2013, 17:54
www.24taas.com,वृत्तसंस्था, मुंबई,हृदयविकाराचा झटका आल्यानं उपचारांसाठी मुंबईच्या लीलावती इस्पितळात दाखल असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना बहुदा उद्या(गुरुवार) इस्पितळातून घरी सोडण्यात येणार आहे.
दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांचे सेक्रेटरी मुर्शीद खान यांनी गुरुवारी दिलीप कुमार इस्पितळातून घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती दिली. दिलीप कुमार यांची तब्येत आता पूर्ण बरी असून गुरुवारी दुपारपर्यंत इस्पितळातून सुट्टी मिळेल असे खान यांनी सांगितलं.
नव्वद वर्षीय या अभिनेत्याला १५ सप्टेंबरला रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने दिलीप कुमार यांना मुंबईच्या लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आले होते. विविध चाचण्यांनतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.
‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमारांचे `ज्वार भाटा`, `मेला`, `नया दौर`, `तराना`, `गंगा जमुना`, `लीडर`, `मुगल-ए-आजम`, `शक्ति`, `कर्मा` आणि `सौदागर` हे काही गाजलेले चित्रपट आहेत. १९९८ला प्रदर्शित ‘किला’ चित्रपटानतंर दिलीप कुमारांनी चित्रपटातून संन्यास घेतला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, September 25, 2013, 17:54