Last Updated: Monday, May 12, 2014, 10:56
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या लोकप्रिय मालिकेतले ‘आबा’ आता आपल्याला चक्क ‘सिक्स पॅक्ज अॅब्ज’मध्ये दिसणार आहेत. इतकंच नाही, तर ते एका गाण्यावर ठेका धरतानाही आपल्याला दिसतील.
बहुरंगी-बहुढंगी मराठमोळे अभिनेते दिलीप प्रभावळकर बऱ्याच वेळेनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आपल्या अभिनयाची जादू पसरवण्यासाठी दाखल होत आहेत. अभिनेता श्रेयस तळपदे याचं होम प्रोडक्शन असलेल्या ‘पोश्टर बॉईज’ या सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये ‘सिक्स पॅक्ज अॅब्ज’मधले प्रभावळकरांना तुम्ही पाहिलंच असेल पण ते या सिनेमात एका गाण्यावर तालही धरताना दिसणार आहेत.
याआधी ‘एन्काऊंटर’ या हिंदी चित्रपटात एक संपूर्ण गाणं दिलीप प्रभावळकर यांच्यावर एक गाणंही चित्रित झालं होतं. ‘पण ती खूप जुनी गोष्ट आहे... या वयात नाचायचं जेव्हा अंगावर आलं तेव्हा पहिल्यांदा धडकीच भरली होती पण कोरिओग्राफरनं ही जबाबदारी पेलली’ असं दिलीप प्रभावळकर सांगतात.
मुख्य म्हणजे, गाण्याच्या चित्रिकरणाच्या एक दिवस आधीच दिलीप प्रभावळकरांच्या पायाला दुखापत झाली होती, पण त्याही परिस्थितीत त्यांनी आढेवेढे न घेता या गाण्याचं शूटींग नाचासहीत पूर्ण केलं.
‘पोश्टर बॉईज’ या मराठी चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासोबतच अनिकेत विश्वासराव, हृषिकेश जोशी, पूजा सावंत आणि पल्लवी सुभाष यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. समीर पाटील यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 12, 2014, 10:56