खन्ना संपतीवरून डिंपलचे अनिताला आव्हान, Dimple and Anita fought in court again

खन्ना संपतीवरून डिंपलचे अनिताला आव्हान

खन्ना संपतीवरून डिंपलचे अनिताला आव्हान
www.24taas.com,मुंबई

सुपरस्टार राजेश खन्ना तथा काका यांच्या ५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा वाद हायकोर्टापर्यंत पोहोचला आहे. अनिता अडवाणी नव्हेत, तर आपणच या मालमत्तेचे खरे वारस असल्याचा दावा करणारी याचिका अभिनेत्री डिंपल कापडिया यांनी दाखल केली आहे. त्यामुळे नवा वाद पुढे आला आहे.

खन्ना यांच्यासोबत गेली १० वर्षे आपण राहत होतो. त्यामुळे आशीर्वाद बंगल्याचा हिस्सा आणि महिन्याला १० लाख रुपये खर्च मिळावा, अशी विनंती करणारा कौटुंबिक छळ प्रतिबंधक कायद्याखाली अर्ज अनिता अडवाणी यांनी वांद्रे न्यायालयात केला आहे. त्यात न्यायालयाने डिंपल, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना व रिंकी खन्ना यांना ४ डिसेंबरला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

राजेश खन्ना यांच्यासोबत आपला विवाह झाला आहे. अनिता हिच्याबरोबर झालेला नाही. त्यामुळे खन्ना यांच्या मालमत्तेवर अनिता दावा करू शकत नाहीत. वांद्रे न्यायालयातील ही तक्रार रद्द करावी व पुढील सुनावणीपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश स्थगित करावे, अशी मागणी याचिकेत केली आहे.

दरम्यान, अभिनेता अक्षयनेही या याचिकेला पाठिंबा देणारी याचिका केली आहे. ट्विंकल आणि रिंकीही अशीच स्वतंत्र याचिका करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे संमजस्याने वादावर तोडगा पडण्याची शक्यता आता तरी कमीच असल्याचे दिसून येत आहे.

First Published: Sunday, December 2, 2012, 16:41


comments powered by Disqus