Last Updated: Thursday, August 8, 2013, 17:49
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई शाहरुख खान आणि दीपिका पदूकोन यांचा बहुचर्चित सिनेमा `चेन्नई एक्सप्रेस` उद्या म्हणजे शुक्रवारी रिलीज होतोय. त्याआधीच दीपिकानं मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात हजेरी लावली. या सिनेमाच्या यशासाठी दीपिकानं बाप्पाकडे प्रार्थनाही केलीय.
महिला दिनी शाहरुखनं घोषणा केल्यानुसार ‘चेन्नई एक्सप्रेस’ या सिनेमात पहिल्यांदाच क्रेडीट स्क्रोलवर अभिनेत्याऐवजी अभिनेत्रीचं नाव पहिल्यांदा दिसणार आहे. म्हणजेच शाहरुखच्या अगोदर आपल्याला दीपिकाचं नाव पाहायला मिळणार आहे.
यूटीव्ही मुव्हीजच्या माध्यमातून हा सिनेमा प्रदर्शित होतोय. हा ‘अॅक्शन कॉमेडी’ चित्रपट रोहित शेट्टीनं दिग्दर्शित केलाय. २००७ साली ब्लॉकब्लस्टर ठरलेल्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटानंतर या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिका आणि शाहरुखची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, August 8, 2013, 17:38