दीपिका आता हॉलिवूडमध्ये!, dipika enter the hollywood

दीपिका आता हॉलिवूडमध्ये!

दीपिका आता हॉलिवूडमध्ये!
www.24taas.com झी मीडिया, मुंबई

चेन्नई एक्सप्रेसमुळे चर्चेत आलेली दीपिका पदुकोण आता एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण आचा लवकरच हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. `फास्टू एंड फ्यूरियस 7` या आगामी हॉलिवूड चित्रपटासाठी दीपिका पदुकोणची निवड करण्यात आल्याचे समजते.

ये जवानी हे दिवानी आणि चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटात भर कोटींचा व्यवसाय करत दीपिका आता हॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. `फास्टं एंड फ्यूरियस 7` या चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि चित्रगंदा सिंह यांनी प्रयत्न केले होते. त्यासाठी या दोघींनी स्क्रीन टेस्टही दिली होती. पण चित्रपट निर्मात्याने दीपिका पदुकोणची निवड केली आहे.
या हॉलिवूड चित्रपटात दीपिकाची महत्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाविषयी दीपिकाकडून दुजोरा मिळालेला नाही. सध्या ती शाहरूख खानसोबत दूबईत शूटींगमध्ये व्यस्त आहे.

बॉलिवूडमधील अनेक अभिनेता तसेच अभिनेत्रींनी हॉलिवूड चित्रपटात काम केले होते. यांध्ये प्रामुख्याने तब्बू (दा नेमसेक, लाइफ ऑफ पाई), अमिताभ बच्च न (दा ग्रेट गैट्सबाय), अनिल कपूर (स्लकमडॉग मिलेनियर, मिशन: इंपॉसिबल- घोस्टभ प्रोटोकॉल), ऐश्वर्या राय बच्च न (ब्राइड एंड प्रेजुडिस, दा पिंक पैंथर 2, दा मिस्ट्रेतस ऑफ स्पायइसेस, प्रोवोक्डा), ओम पुरी (सिटी ऑफ ज्वॉएय, दा घोस्टु एंड दा डार्कनेस, ईस्ट, इज ईस्टा) या चित्रपटात काम केले आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, September 6, 2013, 14:31


comments powered by Disqus