दिव्या भारतीची बहीण दाखविणार जलवे divya bharti sister kaynat aarora comeback with khatt mittha

दिव्या भारतीची बहीण दाखविणार जलवे

दिव्या भारतीची बहीण दाखविणार जलवे
www.24taas.com झी मीडिया, मुंबई

अभिनेता अक्षय कुमार यांच्या ‘खट्टा मिठ्ठा’ या सिनेमातील आयटम साँग करणारी कायनात अरोरा तीन वर्षानंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये येणार आहे. कायनात आरोरा ही आता दिग्दर्शक इंद्रकुमार यांच्या ‘ग्रँड मस्ती’ या सिनेमात आपल्याला दिसणार आहे.

‘ग्रँड मस्ती’ हा सिनेमा २००४ मधील ‘मस्ती’ या सिनेमाचा सिक्वेल आहे. या मध्ये विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि अफताब शिवदसानी हे प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांनी या सिनेमातही पहिल्या सिनेमात असणारीच भूमिका साकारली आहे. या सिनेमात कायनात ही विवेक ओबेरॉयसोबत दिसणार आहे.

कायनातने असे सांगितले की, “मला हा सिनेमा लेखक मिलाप यांच्यामुळे मिळाला आहे. त्यांनी मला फोन करून असे सांगितले की, या सिनेमात विवेकसोबत काम करण्यासाठी १०० ते २०० मुलीचे ऑडिशन घेतले गेले आहे” कायनात स्वतःला खूप नशीबवान समजते की, २०० मुलींना मागे टाकून ती या सिनेमासाठी निवडली गेली आहे. कायनात म्हणते की, “मी कोणताही विचार न करता दिग्दर्शक इंद्रकुमार यांच्या या सिनेमासाठी होकार दिला आहे. इंद्रकुमार हे अतिशय चांगले दिग्दर्शक आहेत”

‘ग्रँड मस्ती’ या सिनेमात कायनात अरोरासोबत ब्रूना अब्दूल, कारिश्मा तन्ना, सोनाली कुलकर्णी, मरियम जाकारीया आणि मंजिरी फडणीस हेदेखील काम करणार आहेत. अभिनेती कायनात या सिनेमात एका अशा मुलीची भूमिका करत आहे जी सुरूवातीला अतिशय शांत, चिंताग्रस्त अशी असते आणि कालांतराने तिच्यामध्ये बदल होत जातात आणि ती एक ग्लॅम डॉल होते.

अभिनेत्री कायनातही दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती हिची चुलत बहीण असून कायनात दिव्या भारतीच्या ‘दिवाना’ या सिनेमामुळे प्रभावित झाली आणि तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्यांचा निर्णय घेतला. अभिनेत्री कायनात हीचा ‘ग्रँड मस्ती’ हा सिनेमा येत्या १३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 8, 2013, 19:40


comments powered by Disqus