`बॉबी जासूस`ची भन्नाट 12 रुपं!, dream project of vidya balan

व्हिडिओ : `बॉबी जासूस`ची भन्नाट 12 रुपं!

 <B> <font color=red>व्हिडिओ :</font></b> `बॉबी जासूस`ची भन्नाट 12 रुपं!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

विद्या बालनचा आणखी एक ड्रिम प्रोजेक्ट येतोय. यात विद्या बनलीय ‘बॉबी जासूस’... यात विद्या एक नाही, दोन नाही तर तब्बल 12 वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसणार आहे. फिल्मचा फर्स्ट लूक नुकताच रिव्हिल करण्यात आलाय.

‘परिणिता’पासून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करणारी विद्या बालन आता बॉलिवूडमध्ये चांगलीच स्थिरावलीय. पा, कहाणी, डर्टी पिक्चर अशा बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या फिल्म्सनंतर विद्या आता फिल्मी पडद्यावर जासूस बनलीय. तीही साधीसुधी नव्हे तर बॉबी जासूस...

तब्बल 12 वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसणाऱ्या या बॉबी जासूसला ओळखणं तसं सोपं नसेल... अगदी सेटवर शूटिंग करतानाही आपल्याला कोणी ओळखू शकत नव्हतं, असं विद्या सांगतेय... या फोटोमध्ये तुम्ही याचीच एक झलक पाहू शकता...

फिल्मच्या फर्स्ट लूकमधनं विद्याचे 4-5 लूक्स तर पहायला मिळाले. यामध्ये विद्या कधी पोस्टमन झालीय, तर कधी मौलवी... या बॉबी जासूसच्या कहाणीनं आपण आता पक्के जासूस बनल्याचं विद्या सांगतेय.

बॉबी जासूसचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समर शेखचं डेब्यू डिरेक्शन... पहिल्याच फिल्ममध्ये विद्याची आणि त्याची चांगलीच केमेस्ट्री जुळल्याचं सध्या तरी दिसतंय. आता विद्याची ही जासूसी प्रेक्षकांना कशी वाटतेय, त्याचीच उत्सुकता आहे. मात्र त्यासाठी 4 जुलैची वाट पहावी लागणार आहे.



व्हिडिओ पाहा -




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 30, 2014, 20:52


comments powered by Disqus