दुनियादारी हिट..., duniyadari hit, celebration in zee 24 taas

दुनियादारी हिट...

दुनियादारी हिट...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
झी टॉकीज प्रस्तुत दुनियादारी सिनेमाने बॉक्सऑफिसवर हिट झालाय. फक्त मुंबई आणि पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमाला तुफान यश मिळालंय..

मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनमध्ये दुनियादारीचे शो हाऊसफुल्ल आहेत. वीकेण्डला तर शो हाऊसफुल्ल होतेच. पण महत्त्वाचं म्हणजे गुरुवारपर्यंत सगळ्या शोंचं हाऊसफुल्ल बुकिंग झालंय.

हेच यश दुनियादारीच्या स्टारकास्टने झी 24 तासच्या ऑफिसमध्ये सेलिब्रेट केलं.. अंकुशचा डीएसपी, सईची शिरीन, स्वप्निलचा श्रेयस सा-यांनीच प्रेक्षकांच्या मनात घर केलंय.. मराठी सिनेमांना थिएटर्सना मिळत नाही अशी ओरड होत असतानाच दुनियादारीचं हे यश नक्कीच वाखणण्याजोगं आहे...
फोटोफीचर दुनियादारीचं यश झी २४ तासमध्ये सेलिब्रेट (फोटो)





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 23, 2013, 17:27


comments powered by Disqus