Last Updated: Saturday, February 8, 2014, 15:39
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईइम्रान खान आणि दीपिका पादुकोणसोबत `ब्रेक के बाद` या चित्रपटाद्वारे आपलं करिअर सुरू करणारा दिग्दर्शक दानिश अस्लम आता एक नवा चित्रपट घेऊन येतोय. या चित्रपटाची प्रोड्यूसर आहे एकता कपूर...
बालाजी मोशन पिक्चर्सच्या आगामी चित्रपटात असेल रोमियो-ज्यूलिएटची लव्हस्टोरी पण ही एका ट्विस्टसह... कारण ही स्टोरी असेल `गे लव्हस्टोरी`.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाची कथा अनु मेनननं लिहिलीय. मेनननं यापूर्वी `लंडन, पॅरिस,न्यूयॉर्क` चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती. सिनेमा दोन मुलं आणि एका मुलीच्या भोवताल फिरतो. दोन मुलांपैकी एक मुलगा होमोसेक्शुअल असतो. चित्रपट मे महिन्यात रिलीज होईल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, February 8, 2014, 15:39