एमा वॅटसनने खुलं केलं आपलं सौंदर्याचं गुपीत Emma Watson`s beauty secrets

एमा वॅटसनने खुलं केलं आपलं सौंदर्याचं गुपीत

एमा वॅटसनने खुलं केलं आपलं सौंदर्याचं गुपीत


`हॅरी पॉटर` सिनेमामधील हॅरीची मैत्रीण हरमॉइनी ग्रँगर आठवते? हरमॉइनीची भूमिका साकारणाऱ्या एम्मा वॅटसनचे चाहते तिच्या वयाप्रमाणेच वाढत आहेत. याच चाहत्यांसाठी एमाने आपलं सौंदर्याचं गुपित एका पुस्तकात उघड केलं आहे. यासाठी तिने स्वतःचं सौंदर्य दाखवणारा विशेष फोटोही काढला आहे.

नॅचरल ब्युटी वर्क या जेम्स ह्युस्टनच्या आगामी पुस्तकासाठी २२ वर्षीय एमाचा आंतर्वस्त्रांकीत फोटो काढला आहे. या फोटोत एमाचं शरीर भिजलेलं आहे आणि हातात तिने ऑर्किडचं फुल पकडलं आहे.


या पुस्तकात जगभरातल्या सेलिब्रिटींचे १२० फोटो आहेत. यात ब्रूक शिल्ड, कार्ली क्लॉज, एरिझोना म्युज या सेलिब्रिंटींचे या पुस्तकात फोटो आहेत. पर्यावरणाविषयी जागरूकता पसरवणाऱ्या सेलिब्रिटींचे यात फोटो आहेत. वर्ल्ड अर्थ वीक २०१३ ला या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.

First Published: Thursday, March 28, 2013, 18:15


comments powered by Disqus