शकीलच्या धमकीनं चिंतेत नाही - सोनू निगम, Exclusive: No reason to worry, says Sonu Nigam

शकीलच्या धमकीनं चिंतेत नाही - सोनू निगम

शकीलच्या धमकीनं चिंतेत नाही - सोनू निगम
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

छोटा शकीलकडून मिळालेल्या धमकीवरून गायक सोनू निगमनं अखेर आपलं तोंड उघडलंय. परदेश दौऱ्याहून भारतात परतलेल्या सोनूनं झी मीडियाशी खास संवाद साधताना लोकांना ‘मी धमकीवरून अजिबात चिंतेत नाही आणि लोकांनीही माझी काळजी करू नये’ असं आवाहन केलंय.

नुकतंच अंडरवर्ल्डचा छोटा डॉन शकीलनं कथित रुपात सोनू निगमला कुणासोबत काम न करण्यासाठी धमकी दिलीय. यानंतर सोनूनं छोटा शकीलला एक पत्र लिहिलं असं देखील म्हटलं जात होतं.

सोनू निगम परदेश दौऱ्याहून परतल्यानंतर लगेचच त्यानं झी मीडियाशी संवाद साधला. यावेळी संवाद साधताना ‘मी या संपूर्ण प्रकरणाची अजिबात काळजी करत नाहीए आणि लोकांनीही माझ्याबद्दल काळजी करू नये’ असं सोनूनं म्हटलंय.

मात्र, अजूनही या प्रकरणाबद्दल सोनूनं पोलिसांत तक्रार केलेली नाही. याबद्दल, मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी झी मीडियाशी बोलताना ‘सोनू नियम यांनी तक्रार केली तर पोलिसांकडून त्यांना पूर्ण सुरक्षा पुरविली जाईल. परंतु यासाठी त्यांना अगोदर औपचारिक रुपात तक्रार दाखल करावी लागेल’, असं म्हटलंय. या संपूर्ण प्रकणावर पोलिसांचं लक्ष आहे, असंही त्यांनी म्हटलंय. सिंह यांनी ‘या पद्धतीची कुणाला धमकी मिळत असेल, तर त्यांनी पोलिसांत तक्रार जरूर दाखल करावी’ असा सल्लाही यावेळी दिलाय.

सोनू पोलिसांत तक्रार दाखल करण्यात कचरतोय... त्याला हे प्रकरण लवकरात लवकर संपवायचंय पण खरा प्रश्न आहे तो हा की, शकीलनं ज्या महिलेद्वारे सोनूला धमकी दिलीय तिचं नाव सोनू का घेत नाहीए?

व्हिडिओ पाहा :




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, October 5, 2013, 22:17


comments powered by Disqus