Last Updated: Tuesday, March 18, 2014, 07:11
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने गोरे होण्याच्या क्रीमची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांवर टीका केली आहे.
मी जेव्हा अशा प्रकारच्या जाहिराती पाहतो, तेव्हा मी आश्चर्यचकीत होतो आणि हे सर्व लाजिरवाणं वाटतं, असं शाहरूख खानचं नाव न घेता आमिर खानने म्हटलं आहे.
शाहरूख खानच्या नावाशी ही टीका जोडली जात आहे, कारण शाहरूख खानही पुरुषांना गोरं बनविण्याचा दावा करणाऱ्या एका क्रिमची जाहिरात करताना दिसतो.
या आधीही अशा प्रकारचा वाद शाहरुख आणि आमिर खानमध्ये झाला आहे.
आमिर खानची ही टीका शाहूरूख खान मनाला लावून घेतो का?, आणि यावर काय उत्तर देतो, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.
First Published: Monday, March 17, 2014, 22:36