नागराज मंजुळेच्या फँड्रीचा अमेरिकेत गौरव fandry also felicitated in america

नागराज मंजुळेच्या फँड्रीचा अमेरिकेत गौरव

नागराज मंजुळेच्या फँड्रीचा अमेरिकेत गौरव
www.24taas.com, झी मीडिया, लॉस एंजलिस

नागराज मंजुळेच्या फँड्रीला बेस्ट फीचर फिल्म म्हणून इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ लॉस एंजलिसमध्ये गौरवण्यात आलं आहे. मराठीतल्या या सिनेमानं अनेकांना भारतीय सिनेसमीक्षकांकडून पसंतीची दाद मिळवलेली आहे.

आता अमेरिकेतही या सिनेमाला गौरवण्यात आल्याने मंजुळेंनी समाधान व्यक्त केलं आहे.

तसेच आपला आनंद सोशल नेटवर्किंग साईट्स फेसबुकवर व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली पौगंडावस्थेतल्या मुलाची ही प्रेमकहाणी आहे. सोमनाथ अवघडे, राजेश्वरी खरात आणि किशोर कदम यांच्या फँड्रीमध्ये प्रमुख भूमिका आहेत.

First Published: Monday, April 14, 2014, 22:46


comments powered by Disqus