Last Updated: Friday, January 17, 2014, 20:53
www.24taas.com, झी मीडिया, पुणे पुण्यात झालेल्या ‘पिफ’ म्हणजेच पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये एस्सेल व्हिजन प्रस्तुत आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फॅन्ड्री’ सिनेमावर पुरस्कारांचा वर्षाव झाला.
‘फॅन्ड्री’ला ‘सर्वोत्कृष्ट सिनेमा’ म्हणून गौरविण्यात आलंय. याबरोबरच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नागराज मंजुळे, सर्वोत्कृष्ट अभिनेता सोमनाथ आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी विक्रम अमलारी आणि प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीची फिल्म असे पाच पुरस्कार मिळवत ‘फॅन्ड्री’ने बाजी मारली.
राज्य सरकारतर्फे देण्यात येत असलेला ‘संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारा’वर ‘फॅन्ड्री’ने मोहोर उमटवलीय. तर आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘नारबाची वाडी’ या सिनेमाचा संगीत दिग्दर्शक मंगेश धाकडेला सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून गौरविण्यात आलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, January 17, 2014, 20:53