Last Updated: Monday, December 10, 2012, 18:27
www.24taas.com, मुंबईबॉलीवुड अभिनेता फरदीन खान आणि त्याची पत्नी आपल्या जुळ्या मुलांची वाट बघत होते, मात्र, पत्नी नताशाचा गर्भपात झाल्याने फरदीन आणि त्याचा पत्नीचे हे स्वप्न लांबणीवर पडले आहे.
रविवार रात्री फरदीनने ट्विटरवर ट्विट केले- “ जितका आनंदीत मी नताशाचे गरोदरपणाची बातमी देताना होतो तितकचे मला दुःख तिचा गर्भपातची बातमी देताना होत आहे”.
फरदीन नताशाला पूर्वीप्रमाणे भावानिक आधार देत आहे. फरदीनने पुढे ट्विट करताना सांगितले की नताशाची तब्येत चांगली आहे आणि त्यामुळे बाळासाठी ते पुन्हा प्रयत्न करू शकतात. फरदीन आणि नताशाचं लग्न २००५ साली झालं होतं.
नताशा ही अभिनेत्री मुमताज यांची मुलगी आहे. फरदीने २६ ऑक्टोबरला आपण बाप बनणार असल्याची बातमी ट्विटरवरून दिली होती.
संबधित बातम्या बॉलिवूडमधील ‘हिंदू-मुस्लीम’ विवाह...
First Published: Monday, December 10, 2012, 16:39