कसा आहे सिटीलाईट्स सिनेमा? film review : citylights

कसा आहे सिटीलाईट्स सिनेमा?

कसा आहे सिटीलाईट्स सिनेमा?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सिटीलाईट्स हा सिनेमा फॉक्स स्टार स्टुडिओचा आहे. एक गरीब दुकानदार दीपकची ही कहानी आहे.

दीपकची भूमिका राजकुमार राव यांनी साकारली. तर दीपकची पत्नी राखीची भूमिका पत्रलेखाची आहे. त्यांच्यासह त्यांची मुलगी मालती त्यांच्यासोबत आहे.

दीपक आपल्या कुटुंबासह अधिक पैसे कमावण्याच्या अपेक्षेने मुंबई गाठतो.

मात्र मुंबईला आल्यानंतर दीपकच्या जीवनात आणखी संघर्ष सुरू होतो.

दीपक समोरचा संघर्ष विचित्र रूप घेतो, इच्छा नसतांनाही पत्नी राखीला डान्स बारमध्ये काम करावं लागतं.

दीपक एका सिक्युरिटी एजन्सीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो.

या सिक्युरिटी एजन्सीचं काम दीपकला ज्या सुपरवायझरने दिलं असतं, तो सुपरवायझर दीपककडून मालकाचे पैसे लुटण्यासाठी मदत मागतो.

दीपक हो-नाही म्हणत त्याची मदत करतो, पण काम फत्ते होण्याच्या आधी सुपरवायझर मारला जातो.

यानंतर दीपक पैस लुटतो का? दीपकच्या परिवाराचं भविष्य असुरक्षित होतं की सुरक्षित? ही चित्रपटाची कहाणी आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 31, 2014, 11:59


comments powered by Disqus