Last Updated: Tuesday, January 22, 2013, 15:34
www.24taas.com, मुंबई बॉलिवूड अभिनेत्री दिपीका पदुकोण ही कधी प्रेमामुळे तर कधी एखाद्या भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असते. पण यावेळेस ती चर्चेत आहे ती म्हणजे एका कार्यक्रमात तिने परिधान केलेल्या वस्त्रांमुळे...
तिने परिधान केलेल्या वस्त्रांमुळे अनेकांचे होश उडाले होते.मुंबईत रविवारी रात्री यशराज स्टुडिओत फिल्मफेयर अवॉर्डसचा रंगारंग सोहळा होता. या अवॉर्डससाठी बॉलिवूडमधील अनेक तारे-सितारे अवतरले होते. त्यात अनेक अभिनेत्रींना पाहून अनेकजण घायाळ झाले होते.
अनुष्का शर्मा, आलिया भट्ट, नेहा धुपियासह अनेकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र या सगळ्यात आकर्षणांचं बिंदू होतं ते म्हणजे दिपीका पदुकोण. काळ्या रंगाचा चमचमत्या असा खास ड्रेस परिधान करून येणाऱ्या दिपीकाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलं. अनेकजणांनी तिच्या या ड्रेसबद्दल तिला दादही दिली. या कार्यक्रमात अनेक अभिनेत्री ह्या अगदीच बोल्ड लूक मध्ये दिसून आल्या.
First Published: Tuesday, January 22, 2013, 15:17