Last Updated: Saturday, February 2, 2013, 18:40
www.24taas.com, नागपूरअभिनेत्री करिष्मा कपूरने फसगत केल्याची तक्रार नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. ३० जानेवारीला एका कार्यक्रमासाठी करिष्माने नागपूरमध्ये येण्याचं मान्य केलं होतं.
त्यासाठी तिला ४ लाख रुपये मानधन दिल्याचंही आयोजकांचं म्हणणं आहे. मात्र, आयत्यावेळी करिष्माने कार्यक्रमाला दांडी मारली. यामुळे आयोजकांवर मात्र टाळ्या वाजवत बसण्याची वेळ आली. तसंच दिलेले ४ लाख रुपये परत करण्यासही करिष्माने नकार दिला आहे.
यामुळे करिष्मा विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत नागपूर पोलीस मुंबईत येऊन या प्रकरणाची शहानिशा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
First Published: Saturday, February 2, 2013, 14:51