शाहरूख खान, गौरी खान विरोधात खटला दाखल, FIR lodged against Shah Rukh, Gauri and Karan Johar

शाहरूख खान, गौरी खान विरोधात खटला दाखल

शाहरूख खान, गौरी खान  विरोधात खटला दाखल
www.24taas.com, मुजफ्फरपूर

बिहारमधील मुजफ्फरपूर मधील स्थानिक कोर्टाच्या आदेशानुसार नुकताच दिग्दर्शित झालेला सिनेमा `स्टुडंट ऑफ दी ईअर`मध्ये हिंदुंच्या भावनिक भावनांना दुखावल्याचा आरोपाबाबत सिनेमाचा निर्माता शाहरूख खान, गौरी खान आणि करण जोहर सहित आणखी ४ लोकांवर खटला दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांच्या मते, मुख्य न्यायदंडाधिकारी एसपी सिंग यांच्या आदेशानुसार काल रात्री जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन मध्ये FIR दाखल करून घेण्यात आला आहे. कलम ३२६ च्या अंतर्गत हा खटला दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.

अधिवक्ता सुधीर कुमार ओझाने पाच नोव्हेंबरला सिनेमाचा निर्माता शाहरूख खान, आणि त्याची पत्नी गौरी खान, दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री आलिया भट्ट यांच्याविरोधात हिंदुंची देवी राधाला अश्लील स्वरूपात प्रस्तुत केल्याने कोर्टात तक्रार केली होती. ओझाने शाहरूखची कंपनी रेड चिली एंटरटेनमेंट आणि करणची कंपनी धर्मा प्रॉडक्शनला ही आरोपी केलं आहे. पोलिसांनी याबाबतीत कलम २९४, २९५ आणि २९५ अ अंतर्गत तक्रार दाखल करून घेतली आहे.

First Published: Friday, November 9, 2012, 16:52


comments powered by Disqus