`बदमाष बबली!`चा फर्स्ट लूक First look of Badmash Babli

`बदमाष बबली!`चा फर्स्ट लूक

`बदमाष बबली!`चा फर्स्ट लूक
www.24taas.com, मुंबई

आयटम साँग्जच्या प्रवाहात आता आणखी एक आयटम साँग येत आहे. शूटआऊट अॅट वडाळा या सिनेमात प्रियंका चोप्रा आयटम साँगवर डान्स करणार आहे.

या गाण्यासाठी प्रियंका चोप्राने ‘सारा जमाना हसीनों का दिवाना’ या गाण्यातील अमिताभ बच्चनच्या बल्बनी झगमगणाऱ्या कपड्यांसारखेच कपडे घातले आहेत. या गाण्यात तिचं नाव ‘बदमाष बबली’ आहे. गाण्यातले शब्द आणि डान्स व्हल्गर नसेल, याकडे तिने जातीने लक्ष दिलं होतं.



या गाण्याबद्दल ट्विटरवर घोषणा करण्यात आली, “ती विद्युल्लता आहे. सारा झमाना हसीनों का दिवाना या गाण्यातील अमिताभ बच्चन यांच्या बल्ब्सनी सजलेल्या पोषाखात ती दिसेल.” याच घोषणेबरोबर तिचा एक फोटोही ट्विटरवर टाकण्यात आला आहे.

First Published: Monday, March 11, 2013, 23:00


comments powered by Disqus