Last Updated: Thursday, January 2, 2014, 10:15
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई दिग्दर्शिका फराह खान हिचा ‘हॅप्पी न्यू इअर’ यंदा दिवाळीत प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. शाहरुख खान आणि दीपिका पादूकोन ही जोडी या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे.
शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज एन्टरटेन्मेंट प्रा. लि’च्या माध्यमातून निर्मिती झालेला या सिनेमात अभिषेक बच्चन, सोनू सूद, बोमन इरानी आणि विवान शाह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून बराच अवधी असला तरी सिनेमाचं पहिलं पोस्टर नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना ‘हॅपी न्यू इअर’ म्हणतंय.
कलाकारांच्या फॅन्ससाठी सोशल मीडियावर हे पहिलंच पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. फराह खान हिचा ‘हॅपी न्यू इअर’ हा खूप महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट मानला जातोय. या पोस्टरबद्दल बोलताना फराह म्हणते, ‘माझा ड्रीम प्रोजेक्ट हॅपी न्यू इअर आणखी एक पायरी चढतोय... आज या सिनेमाचं पहिलं-वहिलं पोस्टर लॉन्च झालंय. हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकेल असा मला विश्वास आहे... आणि हा सिनेमा यंदाच्या वर्षातील सर्वात मनोरंजक सिनेमा ठरेल अशीही मला खात्री आहे. शाहरुख खान आणि मी एकत्रित काम करण्याचं आमचं स्वप्नही यानिमित्तानं पूर्ण होतंय. त्यामुळे हा हॅपी न्यू इअरचं ठरणार आहे’.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 2, 2014, 10:07