Last Updated: Saturday, June 14, 2014, 16:15
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई‘रागिणी एमएमएस-2’च्या यशानंतर अभिनेत्री सनी लिऑन आपली सेक्सी प्रतिमेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतेय. सनी तिच्या आगामी चित्रपटात एका नव्या अवतारात दिसणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘लीला’ आहे.
चित्रपट समिक्षक तरन आदर्श यांनी ट्विटरवर या फिल्ममधील सनीचा फर्स्ट लूक प्रसिद्ध केलाय. तरन यांनी फिल्मबद्दलबी माहिती दिलीय.
सोशल नेटवर्किंग साईटवर प्रसिद्ध झालेल्या या पोस्टरमध्ये सनी एका सिंहासनावर बसलेले दिसतायेत. तिच्या मागे प्रकाश दिसतोय. पोस्टरमध्ये सनीनं खूप दागिने घातलेत. मात्र या रुपातही सनी खूप हॉट दिसतेय. तिचे चाहते हे पाहून नक्कीच खूश होतील.
फिल्म निर्माते भूषण कुमार यांच्या टी-सीरिज हा चित्रपट करतायेत. तर दिग्दर्शन बॉबी खान करणार आहेत. चित्रपटात एकूण 9 गाणी आहे. भूषण कुमार म्हणाले, ‘लीला’साठी ते अतिशय उत्सुक आहेत आणि चित्रपटाची कथा खूप शानदार आहे. विशेष म्हणजे सनी लिऑन नेहमीच्या अवतारापेक्षा वेगळ्या अवतारात आपल्याला दिसणार आहे. सोबतच सनी लिऑन विशाल पांडेचा आगामी चित्रपट ‘हेट स्टोरी-2’मध्ये आयटम नंबर पण करतांना दिसेल.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, June 14, 2014, 13:25