२०१४ बॉलिवूडसाठी असेल `खान इअर`!For Bollywood 2014 can be Khan year, 8 film of Khan will be release

२०१४ बॉलिवूडसाठी असेल `खान इअर`!

२०१४ बॉलिवूडसाठी असेल `खान इअर`!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडमधल्या खानच्या सिनेमांविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. या नवीन वर्षात बॉलिवूडच्या खान मंडळीचे एकूण ८ सिनेमे थिएटरवर धडकणार आहेत. खानचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर झळकणार म्हणजे इतर हिरोंच्या सिनेमांना टशनच म्हणावी लागेल.

मोठ्या शिताफिनं तारखा निवडून ते आपले सिनेमे प्रदर्शित करतात आणि मग एका वर्षात एकच सिनेमा जरी प्रदर्शित झाला तरी त्यांना हरकत नसते. यावर्षी मात्र सगळ्या खानमंडळींचे मिळून ८ सिनेमे थिएटरवर झळकणार असून यावेळेला त्यांनी वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे चाहत्यांना देऊ केलेत. आमिर, सलमान आणि शाहरुख प्रत्येकी २ तर सैफ अली खान आपले ३ सिनेमे घेऊन चाहत्यांना खूष करण्यासाठी सज्ज झालाय.

आमिरच्या धूम ३ नं ४०० कोटींपर्यंत गल्ला जमवल्याची चर्चा आहे. मात्र या मोठ्या यशानंतर आमिर राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ या सिनेमातून राजकारणावर उपहासात्मक भाष्य करताना दिसून येणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात हा सिनेमा रिलीज होईल.

२०१३ या वर्षात सलमान खाननं एकही सिनेमा आणला नाही. मात्र येत्या २६ जानेवारीला ‘जय हो’ हा सिनेमा तर वर्षाच्या मध्यातच साजिद नाडीयावाला दिग्दर्शित ‘किक’ या सिनेमातून तो झळकणार आहे..

तिसरा हुकमी एक्का आहे शाहरुख खान… फराह खान दिग्दर्शित ‘हॅप्पी न्यू इयर’ आणि मनीष शर्मा दिग्दर्शित ‘फॅन’ सिनेमातून तो चाहत्यांसमोर येणार आहे.

सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे सैफ अली खान यंदा ३ सिनेमे घेऊन येतोय... फँटम, हमशकल्स आणि हॅपी एन्डींग अशा ३ सिनेमातून तो झळकणार आहे.. फँटममध्ये कतरिना आणि हॅपी एन्डींगमध्ये करिनासोबत असणारा सैफ हमशकल्स मध्ये तिहेरी भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय... एकूणच काय तर हे वर्ष बॉलिवूडसाठी `खान इअर` म्हटल्यास वावगं ठरणार नाही.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 13, 2014, 10:29


comments powered by Disqus