Last Updated: Friday, April 26, 2013, 10:55
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अमोल पालेकर दिग्दर्शित `वी आर ऑन- होऊन जाऊ द्या` हा मराठी सिनेमा. तर आशिकीचा सिक्वल आशिकी-२ आणि हुसैनची प्रमुख भूमिका असलेला श्री.
कॉमेडीचा धमाका घेऊन आपल्या भेटीला येतायेत दिग्दर्शक अमोल पालेकर `WE ARE ON- होऊन जाऊ द्या` हा मराठी सिनेमा या आज रिलीज होतोय.हलकीफुलकी कॉमेडी असलेल्या या सिनेमात आजच्या तरुणाईची भाषा आणि जोश पहायला मिळणार आहे. अशोक सराफ, मकरंद अनासपूरे, दिलीप प्रभावळकर, आनंद इंगळे, मनोज जोशी, आतिशा नाईक, निवेदीता सराफ, पुष्कर श्रोत्री अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात दिसणार आहे..
या एकमेव मराठी सिनेमासह हुसैनची प्रमुख भूमिका असलेला श्री सिनेमाही आज बॉक्सऑफिसवर आपलं नशीब आजमावरणार आहे. सस्पेन्स, थ्रीलर असा जॉनर असलेल्या या सिनेमातून हुसैन सिल्व्हर स्क्रीनवर पदार्पण करतोय.
तर 90 च्या दशकात गाजलेल्या आशिकीचा सिक्वेल आशिकी 2सुद्धा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. रोमान्स आणि अँक्शनचा तडका असलेल्या या सिनेमात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका आहे.. आशिकीप्रमाणेच आशिकी 2 ची गाणीही रिलीजच्या आधीच हीट झालीयेत.
तेव्हा कॉमेडी, रोमान्स आणि सस्पेन्स अशा वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांचा ऑपश्न या आज तुम्हाला मिळणार आहे.
First Published: Friday, April 26, 2013, 10:55