‘गो गोवा गॉन’चं ऑनलाईन प्रमोशन...,`Go goa gone` trailer

‘गो गोवा गॉन’चं ऑनलाईन प्रमोशन...

‘गो गोवा गॉन’चं ऑनलाईन प्रमोशन...
www.24taas.com, नवी दिल्ली

दिग्दर्शक राज निदिमोरू आणि कृष्णा डी के यांचा आगामी कॉमेडी ‘गो गोवा गॉन’ या सिनेमाचा ट्रेलर मंगळवारी ऑनलाईन रिलीज करण्यात आलाय. त्याला टीव्हीवरही चांगला प्रतिसाद मिळतोय. सैफ अली खान, वीर दास, कुणाल खेमू आणि पुजा गुप्ता यांना प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळतेय.

सोशल साईटवर फारसा सक्रीय नसलेल्या सैफ अली खाननंही आपल्या ‘ऑनलाईन’ चाहत्यांचे आभार मानले आहेत. `गो गोवा गॉन`चा ऑनलाईन ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिक्रियांबद्दल मी त्यांचा आभारी आहे’ असं सैफनं म्हटलंय.

सैफची प्रोडक्शल कंपनी ‘इल्यूमिनाती फिल्मस’निर्मित ‘गो गोवा गॉन’ हा सिनेमा १० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

First Published: Wednesday, March 27, 2013, 12:16


comments powered by Disqus