ग्रँड मस्तीने चेन्नई एक्स्प्रेसला मागे टाकले, `Grand Masti` Box Office Collection: Adult Comedy Surpasses ₹100

ग्रँड मस्तीने चेन्नई एक्स्प्रेसला मागे टाकले

ग्रँड मस्तीने चेन्नई एक्स्प्रेसला मागे टाकले
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी याच्या ग्रँड मस्ती चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल केली आहे. इतकेच नाही तर ग्रँड मस्तीने फायद्याबाबतीत शाहरुख खानच्या चेन्नई एक्स्प्रेसला मागे टाकले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, ग्रँड मस्तीला २०७ टक्के फायदा झाला तर चेन्नई एक्स्प्रेसला २०२ टक्के फायदा झाला आहे.

मात्र, कमाईच्या बाबतीत अजूनही चेन्नई एक्स्प्रेस अजूनही टॉपवर आहे. शाहरुखच्या एक्स्प्रेसने २५० कोटी पेक्षा अधिकचा गल्ला जमवला आहे. तर ग्रँड मस्तीने ९५ कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे.

पण खर्च आणि उत्पन्नाचा विचार करता फायद्याबाबतीत ग्रँड मस्तीने शाहरुखच्या चेन्नई एक्स्प्रेसला मागे टाकले आहे. ग्रँड मस्तीची मस्ती अजूनही बॉक्स ऑफिसवर सुरू आहे.

मल्टी स्टारर ग्रँड मस्ती एक अडल्ट कॉमेडी फिल्म आहे. शाहरुख, दीपिका स्टाटर चेन्नई एक्स्प्रेस ही रोमँटिक फिल्म आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 1, 2013, 17:41


comments powered by Disqus