हरभजन सिंगची गर्लफ्रेंड गीता बसरा प्रेग्नंट, Harbhajan Singh`s girlfriend Geeta Basra are Pregnent!

हरभजन सिंगची गर्लफ्रेंड गीता बसरा प्रेग्नंट

हरभजन सिंगची गर्लफ्रेंड गीता बसरा प्रेग्नंट
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई

भारतीय क्रिकेटर ऑफ स्पिनर हरभजन सिंग याची मैत्रिण गीता बसरा प्रेग्नंट आहे. तुमचा विश्वास बसत नाही ना, मात्र, ही घटना खरी आहे. मात्र, ही नेहमीच्या जीवनातील गोष्ट नाही. ती आहे, सिनेमातील. तिच्या आगामी सिनेमात गरोदर महिलेची गीता भूमिका करीत आहे.

गीता बसरा आपल्या आगामी `कॉलिंग मिस्टर जो बी कार्वाल्हो` या सिनेमात गरोदर स्त्रीची भूमिका निभावत आहे `कहानी` या सिनेमात विद्या बालनने गर्भवती नायिकेची भूमिका केली होती. विद्याची भूमिका हीट झाल्यानंतर आता नायिकाही अशा भूमिका करण्यास पुढे येत आहेत. गीता बसेरा हिनेही हाच फार्म्युला स्वीकालाय. आपले करिअर घडविण्यासाठी गीता बसराने हे पाऊल उचलले आहे. मात्र, तिने विद्या बालनचा आर्दश घेतला नसल्याचे म्हटलंय.

ही भूमिका करण्यासाठी हॉलीवूड सिनेमा ‘जुनो’ हा अनेकवेळा पाहिला. ‘जुनो’ या सिनेमात एका किशोरवयीन गरोदर मुलीची कहाणी आहे. तर गीता बसरा एका कुमारीमातेची भूमिका बजावत आहे. या भूमिकेबाबत गीता खूप आनंदी आहे. या भूमिकेबाबत प्रक्षेकांना काय वाटेल ते वाटो. मात्र, हा सिनेमा आल्यानंतर माझ्या भूमिकेचे महत्व समजेल, असे गीता बसरा सांगते.

# इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

# झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 9, 2013, 13:10


comments powered by Disqus