हे काय केलंय अनुष्कानं आपल्या ओठांवर?, Has Anushka Sharma done something to her lips?

हे काय केलंय अनुष्कानं आपल्या ओठांवर?

हे काय केलंय अनुष्कानं आपल्या ओठांवर?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

स्टाईल स्टेटमेंट असो, सिनेमा असो किंवा क्रिकेटर विराट कोहली बरोबरचं अफेअर... अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आलीय. यावेळी, ती चर्चेत आलीय तीच्या ओठांमुळे...

नुकताच, `कॉफी विथ करन`च्या एका नव्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. या भागात अनुष्का शर्मा करनची पाहुणी आहे... या ट्रेलरमध्ये अनुष्काच्या ओठांमुळे तिचा चेहरा नेहमीपेक्षा थोडा वेगळाच दिसतोय. त्यामुळे, अनुष्कानं ओठांवर शस्त्रक्रिया केली की काय? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय.

`कॉफी विथ करन`च्या या भागात दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अनुष्का शर्मा एकत्र दिसणार आहेत. या भागाचा ट्रेलर पाहिल्यानंतर आता अनुष्काच्या ओठांबद्दल वेगवेगळी चर्चा सुरू झालीय. ओठांना सुंदर बनविण्यासाठी तिनं आपल्या ओठांवर शस्त्रक्रिया केलीय, असा कयास आता बांधला जातोय. गेल्यावर्षीही अनुष्काच्या ओठांबाबत अशाच प्रकारची चर्चा चांगलीच रंगली होती.

अनुष्काचे ओठ पाहिल्यानंतर काहींनी तर अनुष्कानं आपल्या ओठांची शस्त्रक्रिया करून त्याला नवीन रुप दिल्याचं ठामपणे सांगितलंय. या गोष्ट कितपत खरी आहे, याबाबत निश्चित माहिती नसली तरी `कॉफी विथ करन`मध्ये अनुष्काचा लूक वेगळा आहे, हे मात्र निश्चित.

अनुष्कानं केलेल्या सर्जरीमुळे तिचा चेहरा अगोदरपेक्षा कमी सुंदर दिसतोय, असं काहीचं म्हणणं आहे. सुरुवातीच्या काही सिनेमांमध्ये अनुष्काचे ओठ बारीक दिसत होते. पण आता मात्र त्यांची जाडी दिवसेंदिवस वाढतच चाललीय. आणि शस्त्रक्रियेशिवाय ही गोष्ट शक्य नाही.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 6, 2014, 12:17


comments powered by Disqus