हेमा-धर्मेंद्रची लेक आहना अडकली विवाहबंधनात... , Hema Malini`s daughter Ahana Deol gets engaged

हेमा-धर्मेंद्रची लेक आहना अडकली विवाह बंधनात...

हेमा-धर्मेंद्रची लेक आहना अडकली विवाह बंधनात...
www.24tass.com , झी मीडिया , मुबंई .

अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेता धर्मेंद्र यांची धाकटी कन्या आहना हिचा विवाह रविवारी, २ फेब्रुवारीला पार पडला. दिल्लीचे उद्योगपती वैभव व्होरा याच्याशी ती विवाहबद्ध झालीय.

मुंबईच्या `आयटीसी मराठा` हॉटेलात हा विवाह सोहळा पार पडला. रविवारी सकाळी इस्कॉन मंदिरात जाऊन आहना आणि वैभवने ईश्वराचे आशिर्वाद घेतले.

आहनाचा विवाह पंजाबी आणि दक्षिण भारतीय पंरपरेनुसार पार पडला. लग्नाच्यावेळी आहना डिझायनर निता लुल्लाने तयार केलेल्या ड्रेसमध्ये होती.

लगिनघाईत धरपडल्यामुळे ईशा देओलच्या खांद्याला दुखापत झाली. ईशाच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे फ्रक्चरवर सोनेरी रंगाचे कव्हर लावून आपल्या बहिणीच्या लग्नात ईशा वावरत होती.

आहानाच्या लग्नाला नरेंद्र मोदी, राज ठाकरे सामील झाले होते. काही दिवसांपूर्वी शुटींगमध्ये जखमी झालेल्या शाहरुख खानला चक्क काठीच्या आधारे चालत या लग्नाला यावं लागलं.

आहनाचे सावत्र भाऊ सनी आणि बॉबी मात्र या विवाहाला अनुपस्थित होते. हेमा धर्मेंद्रच्या सांगण्यानुसार कोणतीही वाईट भावना त्यांच्या अनुपस्थितीचे कारण नव्हती. सनी, बॉबी आपल्या बहिणीवर खूप प्रेम करतात, असं आहनाच्या माता-पित्यांचं म्हणणं आहे.

बॉलिवूड आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांमध्ये दिया मिर्झा, सोनाक्षी सिन्हा, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, अमर सिंग, बाबा रामदेव, रणविर सिंग यांनीही आवर्जुन या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली.

पाच फेब्रुवारीला वैभव व्होराच्या फार्म हाऊसवर रिसेप्शन होणार आहे. त्यावेळी सनी, बॉबीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, February 3, 2014, 20:02


comments powered by Disqus