`हायवे` सिनेमाचा ट्रेलर रिलीज, ‘Highway’ trailer: Imtiaz Ali is back with Alia Bhatt, Randeep

आलिया भट्टच्या `हायवे` सिनेमाचा ट्रेलर रिलीज

आलिया भट्टच्या `हायवे` सिनेमाचा ट्रेलर रिलीज
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

दिग्दर्शक इम्तियाज अली याचा `हायवे` या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. ही सिनेमा वास्तवामध्ये आशादायक दिसतो आहे. हा ट्रेलर वेगळ्याच पार्श्वभूमीवर दाखविण्यात आलाय. यामध्ये आलिया भट्ट आणि रणदीप हुडडा याचा ट्रकमधील प्रवास दाखविण्यात आलाय.

या प्रवासात काय घडते याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. तसेच या प्रवाशात आक्रमकेबरोबरच लव्ह सिनही दाखविण्यात आलाय. रणदीप हा कामगाराच्या भूमिकेत दिसतोय. त्याच्या ट्रकमधून एक सुंदर आनंदी तरुणी प्रवास करतेय. प्रवासात ती एकटी असते. ट्रकमधून प्रवास सुरू आहे. या प्रवासात काय काय गोष्टी घडतात, याची झलक या ट्रेलरमध्ये दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आलेय.

हा सिनेमा युटीव्ही मोशन पिक्चर्स आणि साजित नादीयावालाची निर्मिती आहे. हा सिनेमा २१ फेब्रुवारीला थिएटरमध्ये झळकेल. सिनेमात रणदीप हुडासोबत आलिया भट्ट काम करीत आहे. हा सिनेमा आपल्यासाठी खूप खास असल्याचं आलियाने म्हटलंय. ‘स्टुडंट ऑफ द इयर’नंतर आलिया भट्टचा ‘हायवे’ हा दुसार सिनेमा आहे.

दरम्यान, ट्विटरवर आलिया भट्टने आपले शुटिंग दरम्यानचे फोटो अपलोड केले आहेत. `हाय़वे` सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी खूप धमाल आली. शुटिंगदरम्यान आपण खूप मस्ती केल्याचंही तिने म्हटलं. हा सिनेमा प्रेक्षकांनाही खूप आवडेल, असं आलियाचं म्हणणं आहे.

पाहा हायवेचा ट्रेलर



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


First Published: Tuesday, December 17, 2013, 14:47


comments powered by Disqus