Last Updated: Friday, July 19, 2013, 14:04
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअभिनेता सलमान खानच्या हीट अँण्ड रनप्रकरणी मुंबई सेशन कोर्टानं आजची सुनावणी पुढे ढकलली आहे. आता २४ जुलैला सुनावणी होणार आहे.
सलमान आज सेशन कोर्टात हजर झाला. त्याच्यासोबत त्याच्या बहिणी अलविरा आणि अर्पिता कोर्टात हजर होत्या. २००२मध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणी सलमानच्या कारनं एकाला चिरडलं होतं तर चौघे गंभीररित्या जखमी झाले होते. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आलाय.
आपल्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू नये यासाठी त्यानं सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र त्याची ती याचिका फेटाळण्यात आली होती. आता सेशन कोर्ट याप्रकरणी काय भूमिका घेतं त्याकडं लक्ष लागलंय. यावेळी सलमान खान दोषी आढळला तर त्याला १० वर्षांची शिक्षा होऊ शकते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, July 19, 2013, 13:54