Last Updated: Tuesday, January 28, 2014, 13:55
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई`हिट अँड रन` प्रकरणात सलमान खानला राज्य सरकारकडून दिलासा मिळालाय. या प्रकरणाची फेरसुनावणी करण्याचा निर्णय सत्र न्यायालयानं दिला होता. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यास राज्य सरकारनं नकार दिलाय.
त्यामुळं आता या प्रकरणाची नव्यानं सुनवाणी होणार आहे. त्यामध्ये आता या प्रकरणातले सर्व साक्षीदार आणि पुराव्यांची नव्यानं तपासणी केली जाणार आहे.
२००२ साली वांद्रेमध्ये दारुच्या नशेत गाडी चालवणाऱ्या सलमाननं ५ जणांना गाडी खाली चिरडलं होतं. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. २०१३मध्ये याबाबत सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा निश्चित झाला होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 28, 2014, 13:55