Last Updated: Wednesday, March 6, 2013, 19:19
www.24taas.com, मुंबईएका नव्या सर्वेक्षणानुसार बॉलिवूड स्टार सलमान खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलं जात आहे. ख्वाब.कॉम नामक एका वेबसाइटने यासंदर्भात सर्वेक्षण केलं.
या सर्वेक्षणातून हाती आलेल्या निकालानुसार पुरुषांमध्ये सलमान खान आणि महिलांमध्ये अनुष्का शर्मा यांना इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलं जात आहे. याशिवाय सर्वाधिक पसंत केली जाणारी मिठाई गुलाब जामुन असल्याचं सर्वेक्षणातून पुढे आलं आहे. अन्न पदार्थांमध्ये दक्षिण भारतीय पदार्थांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.
पर्यटनाच्या दृष्टीकोनातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारतीय पर्यटन स्थळांमध्ये राजस्थानला सर्वाधिक पसंती दिली गेली हे, तर विदेशी पर्यटनासाठी लंडनला सर्वाधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे.
First Published: Wednesday, March 6, 2013, 19:19