अक्षयचा `हॉलिडे` 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल,Holiday reached 100 million

अक्षयचा `हॉलिडे` 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल

अक्षयचा `हॉलिडे` 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अक्षय कुमारची फिल्म `हॉलिडे- अ सोल्जर इज नेवर ऑफ ड्युटी` नं तीन आठवड्यात 100 कोटी रुपये कमावले आहेत. ए. आर. मुरुगादोस दिग्दर्शित ही फिल्म 6 जूनला प्रदर्शित झाली होती.

चित्रपटाचे व्यापार विश्लेषक तरण आदर्शने रविवारी ट्विटरवर टिवट केले की, हॉलिडेचा तिसरा आठवडयातच शुक्रवारी 1.02 कोटी तर शनिवारी 1.87 कोटी रुपये कमविले आहेत.

फिल्ममध्ये अक्षयचे अॅक्शन सिन हे वास्तविक अॅक्शनच्या रुपात दाखवले गेले आहेत. चित्रपट रिलायन्स एंटरटेन्मेंटचा असून निर्मिती ट्विंकल खन्ना आणि विपूल शाहने केली आहे. याआधी अक्षयने विपुलसोबत `नमस्ते लंडन`, `वक्त, द रेस अगेंस्ट टाईम` सारखे यशस्वी चित्रपट दिले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 23, 2014, 18:55


comments powered by Disqus