हॉलिवूड दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग मुंबईत , Holiwood producer Stiwhn Spielberg in Mumbai

हॉलिवूड दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग मुंबईत

हॉलिवूड दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग मुंबईत
www.24taas.com, मुंबई

स्टीव्हन स्पीलबर्ग या प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शकाचं नुकतंच मुंबईत आगमन झालं. लिंकन या स्पीलबर्गच्या सिनेमाला ऑस्करमध्ये मिळेलल्या यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी रिलायन्स एन्टरटेन्मेंट तर्फे त्यांना मुंबई भेटीचं आमंत्रण देण्यात आलं होतं.

या आमंत्रणाला मान देत स्पीलबर्ग आणि त्यांची पत्नी केट कॅपशॉव्ह यांनी मुंबईला भेट दिली. या स्वागत समारंभाला बॉलिवूडच्या दिग्गज अशा 60 सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं होतं. ज्यात आशुतोष गोवारीकर, रोहन सिप्पी, आर बाल्की, किरण राव,मधुर भांडारकर,जावेद अख्तर, सुधीर मिश्रा,रिमा कागदी अशा अनेक बॉलिवूडकर सहभागी झाले.


यावेळी बॉलिवूडच्या या हस्तींना थेट स्पिलबर्गशी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या यावेळी आयोजित केलेला कार्यक्रम होस्ट केला तो खुद्द अमिताभ बच्चन यांनी.... विशेष म्हणजे या भेटीमुळे बॉलिवूड-हॉलिवूड एक होतायत अशी चर्चा पुढे येतेय. इतकंच नाही तर अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एन्टरटेनमेंटबरोबर आणखी काही प्रोजेक्ट करणार असल्यांचंही या कार्यक्रमात स्पष्ट झालं.

First Published: Tuesday, March 12, 2013, 15:36


comments powered by Disqus