Last Updated: Wednesday, January 29, 2014, 16:29
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअभिनेता शाहरूख खानसाठी आपण लुंगी डान्स गाणं मोफत केलं, यासाठी आपण एका पैशाचीही अपेक्षा ठेवली नाही, असं गायक हनी सिंगने म्हटलं आहे. हनी सिंग सध्या तरूणांच्या गळ्यातील ताईत झाला आहे.
शाहरूख आपल्या आईशी बोलला, अजून काय पाहिजे, आपण चेन्नई एक्स्प्रेसमधील गाण्यासाठी रूपयाही घेतला नसल्याचं हनी सिंगने एका कार्यक्रमात बोलतांना म्हटलं आहे.
हनी सिंगने यापूर्वीही कलाकारांनी रॉयल्टी मागू नये असं मत व्यक्त केलं होतं. रॉयल्टीम्हणजे कलाकारांनी काम बंद केल्यावर मिळणारी रक्कम, पण आपल्याला या पैशातही रस नसल्याचं हनीने मोकळेपणाने सांगितलं आहे.
आपल्याला आपल्या गाण्याचा योग्य तो मोबदला मिळेल यांची वाहे गुरू काळजी घेतात, असं हनी सिंगने म्हटलं आहे.हनी सिंगकडून शाहरूखला लुंगी फुकट
अभिनेता शाहरूख खानसाठी आपण लुंगी डान्स गाणं मोफत केलं, यासाठी आपण एका पैशाचीही अपेक्षा ठेवली नाही, असं गायक हनी सिंगने म्हटलं आहे. हनी सिंग सध्या तरूणांच्या गळ्यातील ताईत झाला आहे.
शाहरूख आपल्या आईशी बोलला, अजून काय पाहिजे, आपण चेन्नई एक्स्प्रेसमधील गाण्यासाठी रूपयाही घेतला नसल्याचं हनी सिंगने एका कार्यक्रमात बोलतांना म्हटलं आहे.
हनी सिंगने यापूर्वीही कलाकारांनी रॉयल्टी मागू नये असं मत व्यक्त केलं होतं. रॉयल्टीम्हणजे कलाकारांनी काम बंद केल्यावर मिळणारी रक्कम, पण आपल्याला या पैशातही रस नसल्याचं हनीने मोकळेपणाने सांगितलं आहे.
आपल्याला आपल्या गाण्याचा योग्य तो मोबदला मिळेल यांची वाहे गुरू काळजी घेतात, असं हनी सिंगने म्हटलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 29, 2014, 16:29