सलमान पाहून सोनाक्षी थरथरायला लागली, Hot Gossip: Salman Sonakshi see the trembling came on?

सलमान पाहून सोनाक्षी थरथरायला लागली

सलमान पाहून सोनाक्षी थरथरायला लागली
www.24taas.com, मुंबई

सारेगमा शोच्या सेटवर सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा एकत्र पोहोचले. कारण होते दबंग-२चे प्रमोशन. मात्र, निर्मात्याच्या एका चुकीमुळे सलमानला आपली दबंगिरी दाखविण्याचा मौका मिळाला.

सारेगमाच्या सेटवर सलमान आणि सोनाक्षीचे जोरदार स्वागत केले गेले. यावेळी फोटोसेशनही झाले. त्यानंतर सलमान मीडियाशी बोलले असे वाटले होते. त्याच दरम्यान, सलमानचा एक स्लाईडशो दाखविण्यात आला. सुरूवातीला सलमान खूश होता. त्यानंतर पुढे एकामध्ये सलमानच्या बालपणीचं एक चित्र दाखविण्यात आले. ते चुकीच्या पध्दतीने लावले होते. ते सलमानला रूचले नाही. सलमान लालेलाल झाला.

तो तडक मंचावरून उठून निघाला. कोणाला काय झाले तेच कळाले नाही. मीडिया सलमानची वाट पाहात होता. मात्र, सलमान काही बाहेर आला नाही. सलमान स्लाईड शो तयार करण्याला चांगलाच झापत होता. त्यानंतर सलमान बाहेर आला. सर्वांना वाटले सलमान काहीतरी बोलेल. संवाद साधेल. मात्र, तसे न करता त्यांने कार्यक्रमाच्या निर्मात्यालाच झापले.

सलमानचा अवतार पाहून सेटवरील मंडळी घाबरली. आता काय होईल, याची भीती निर्माण घर करून राहिली. सेटवर उभी असलेली दबंग-२ची नायिका सोनाक्षी सिन्हा सलमानची ही दबंगिरी पाहून खूपच घाबरली आणि कापायला लागली. सलमानचा अवतार खूप भीतीदायक असल्याचा अनुभव सोनाक्षीने घेतला. याचवेळी सलमानने सेट सोडून घरची वाट धरली. यावेळी मीडियाने बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिडलेल्या सलमानने थेट घरचा रस्ता धरला.

First Published: Thursday, December 13, 2012, 19:42


comments powered by Disqus