पाहा आलिया, सोनम, सोनाक्षी, अर्जुन होते तरी कसे?How Fat Sonakshi, Sonam, Arjun kapoor and Aliya bef

पाहा आलिया, सोनम, सोनाक्षी, अर्जुन होते तरी कसे?

 पाहा आलिया, सोनम, सोनाक्षी, अर्जुन होते तरी कसे?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी स्टार पुत्रांनाही चांगलाच मेकओव्हर करावा लागतो. खरं वाटत नाहीय ना... तर मग हा फोटो पाहा... अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर, आलिया भट्ट आणि अभिनेता अर्जुन कपूरला पाहा...

या स्टार्सचे हे आधीचे फोटो पाहून वाटणार सुद्धा नाही की आजचे हे प्रसिद्ध कलाकार आहेत. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि अनिल कपूर यांच्या मुली म्हणजे सोनाक्षी आणि सोनम चांगल्याच जाड होत्या. अभिनेत्री होण्यासाठी त्यांनी आपलं वजन खूपच कमी केलं आणि स्वत:चा मेकओव्हर केला. सोनमनंही आपलं वजन कमी केलं आणि बॉलिवूडमध्ये एँट्री मारली.

अभिनेता अर्जुन कपूर तर तब्बल १४० किलो वजनाचा होता. सलमान खाननं त्याला टिप्स दिल्या आणि अर्जुननं तब्बल ५० किलो वजन कमी केलं. आपल्याला आज दिसतो तो अर्जुन कपूर आणि आधीचा अर्जुन कपूर पाहिला तर आपल्याला ते नक्की कळेल.

दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आणि `स्टुडंट ऑफ द इअर` या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी आलिया भट्ट ही जाड नाही पण बेढप होती. तिनंही स्वत:च्या वजनावर खूप मेहनत घेतली आणि आज दिसणारी स्लिम आलिया समोर आली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 29, 2014, 13:18


comments powered by Disqus