ऋतिक-सुझान पुन्हा आले एकत्र!, Hrithik and Suzanne celebrated son`s birthday together

ऋतिक-सुझान पुन्हा आले एकत्र!

ऋतिक-सुझान पुन्हा आले एकत्र!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गेल्या वर्षी एकमेकांपासून विभक्त झालेली बॉलिवूडची रोमान्टिक जोडी सुझान-ऋतिक रोशन पुन्हा एकदा एकत्र दिसली... आणि याला कारण ठरली ती या दोघांची मुलं...

शनिवारी ऋतिक-सुझानच्या मोठ्या मुलाचा - रेहानचा वाढदिवस होता. या निमित्तानं सुझानच्या घरी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ऋतिक आणि सुझाननं घरी आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं.
यापूर्वी, विभक्त झाल्यानंतर मनानं कोसळलेल्या या जोडप्यानं एकमेकांना टाळणंच पसंत केलं होतं.

डिसेंबर २०१३ मध्ये ऋतिक आणि सुझाननं आपल्या १४ वर्षांच्या वैवाहिक जीवनाला संपुष्टात आणत एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, या जोडप्याची दोन्ही मुलं आपल्या आईसोबत म्हणजे सुझानसोबतच राहत आहेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 1, 2014, 22:16


comments powered by Disqus