ऋतिक -कतरिनाची हॉट जोडी पुन्हा एकत्र Hrithik-Katrina again in new film

ऋतिक -कतरिनाची हॉट जोडी पुन्हा एकत्र

ऋतिक -कतरिनाची हॉट जोडी पुन्हा एकत्र
www.24taas.com, मुंबई

ऋतिक रोशन आणि कतरिना कैफ यांची जोडी गेल्या वर्षी जिंदगी ना मिलेगा दोबारा या सिनेमात दिसली होती. या सिनेमात त्यांचा रोमांस चांगलाच खुलला होता आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीही प्रेक्षकांना जाणवली. आत्तापर्यंत पडद्यावर अगदी सलमान खानसकट कुठल्याच हिरोला ‘किस’ न करणाऱ्या कतरिनाने ऋतिकला मात्र पहिल्याच सिनेमात ‘किस’ केलं होतं. त्यामुळे दोघांची जोडी ही खूप आकर्षक ठरली. ‘अग्निपथ’मध्येही एका गाण्यापुरता ऋतिक आणि कतरिना एकत्र आले होते. आता ऋतिक आणि कतरिना पुन्हा एकदा नव्या सिनेमात एकत्र येत आहेत.

२०१० साली हॉलिवूडमध्ये प्रदर्शित झालेल्या `नाइट अँड डे` या सिनेमाचा हिंदी रिमेक होत आहे. या सिनेमासाठी ऋतिक आणि कतरिनाला करारबद्ध केलं गेलं आहे. मूळ सिनेमात टॉम क्रुझ आणि कॅमेरॉन डिआझने भूमिका साकारल्या होत्या. हा सिनेमा रोमँटिक ऍक्शन सिनेमा होता. मूळ सिनेमा बनवणाऱ्या फॉक्स स्टार स्टुडिओनेच हा सिनेमा हिंदीमध्ये निर्माण करण्याचं ठरवलं आहे.

फॉक्स स्टार स्टुडिओच्या विवेक कृष्णाजींनी सांगितलं, “आम्ही ‘नाईट अँड डे’च्या हिंदी रिमेकसाठी ऋतिक रोशन आणि कतरिना कैफला घेतलं आहे. लवकरच या सिनेमाचं शुटिंग सुरू होईल.”

ऋतिक रोशनाचा शेवटचा ‘अग्निपथ’ सुपरहिट ठरला होता, तर कतरिनाचाही ‘एक था टायगर’ सुपरहिट झाला होता. ऋतिक सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित ‘क्रिश-३’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहे. सिद्धार्थने यापूर्वी ‘अंजाना अंजानी’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

First Published: Sunday, September 30, 2012, 10:39


comments powered by Disqus