बॉलिवूडचे कार चोर हिरो-हिरोईन... , Hrithik Roshan and Katrina Kaif shoot for `Bang Bang`

बॉलिवूडचे कार चोर हिरो-हिरोईन...

बॉलिवूडचे कार चोर हिरो-हिरोईन...

www.24taas.com, झी मीडिया, शिमला

बॉलिवूडची हॉट हिरोईन आणि काम काय तर कार चोरी... ऐकायला विचित्र वाटतयं ना! आणखी आश्चर्यचकीत करण्यासारखी गोष्ट म्हणजे, ही हिरोईन दुसरी-तिसरी कुणी नसून बॉलिवूडची कॅट म्हणजेच कतरिना कैफ होती...

त्याचं झालं अस की, हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमलामध्ये हृतिक आणि कतरिनाच्या `बँग-बँग` या आगामी चित्रपटाचं शुटींग सुरू आहे. शुटींगसाठी हृतिक-कतरिना आपल्या टिमसह शिमलामध्ये तळ ठोकून आहेत.

हॉलिवूडच्या `नाईट अॅन्ड डे` चा चित्रपटाचा बॉलिवूडमध्ये रिमेक तयार होतोय... हा रिमेक म्हणजे `बँग-बँग`... या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान हृतिक आणि कतरिना सोमवारी कार्ट रोड येथील नगर निगमच्या पार्किंगमध्ये पोहचले. तिथून त्यांनी कार चोरली आणि धूम ठोकली. हे लक्षात आल्यानंतर काही लोक त्यांच्या मागे धावू लागले... त्यांना पकडण्यासाठी नाही तर त्यांना पाहण्यासाठी हे लोक धावत होते. हे लोक हृतिक आणि कतरिनाचे फॅन्स होते. ते शुटींग पाहण्यासाठी जमले होते.

`नाईट अॅन्ड डे` या सिनेमात टॉम क्रूझ आणि कॅमरन डियाज हे मुख्य भूमिकेत दिसले होते. टॉम क्रूझ आणि कॅमरन डियाज यांच्या भूमिका हृतिक आणि कतरिना साकारणार आहेत. हृतिक आणि कतरिना यापूर्वी `जिंदगी मिलेगी ना दोबारा` या चित्रपटात एकत्र दिसले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 11, 2014, 16:20


comments powered by Disqus