Last Updated: Wednesday, May 14, 2014, 13:25
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्या गाण्यावर अभिनेता ऋतिक रोशन फिदा झालाय. प्रियंका हिने आंतरराष्ट्रीय गायकांबरोबर गाणे गायले आहे. आता तिचे `आय कान्ट मेक यु लव्ह मी` हे गाणे प्रसिद्ध झालंय. या गाण्यावर चक्क ऋतिक नाचला.
प्रियंका हिच्याबरोबर `क्रिश` आणि `क्रिश 3`ऋतिकने काम केले आहे. ऋतिकने सोशल नेटवर्किंगसाईट ट्विटरवर ट्विट केलेय, मी `आय कान्ट मेक यु लव्ह मी` हे गाण ऐकले आहे. या गाण्याने आपल्याला नाचयला भाग पाडले. खूप छान प्रियंका. हे गाणे बढीया आहे.
हे गाणे गायिका बोनी रॅटच्या1991मधील गाण्याचे नविन रुप आहे. प्रियंकाचे हे गाणे एप्रिलमध्ये रिलीज झाले आहे. 24 तासात या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला. भारतात या गाण्याला तिसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 14, 2014, 12:45