हृतिक आणि सुजान राहणारे वेगळे!Hrithik Roshan and Sussanne taking Divorce,Hrithik official Statement

हृतिक आणि सुजान राहणारे वेगळे!

हृतिक आणि सुजान राहणारे वेगळे!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेता ह्रतिक रोशन आणि सुजान यांचा संसार अखेर संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. अभिनेता हृतिक रोशनची पत्नीनं ह्रतिकपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्याचं हृतिकनं एका निवेदनात म्हटलंय.

हृतिकनं पत्रकारांना ही माहिती दिली. हृतिक म्हणाला, “सुजाननं वेगळं राहण्याचा निर्णय घेतलाय आणि आमचं मागील १७ वर्षांचं नातं संपुष्टात आलंय. माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी हा काळ अतिशय कठीण आहे. त्यामुळं आमचं खाजगी जीवन खाजगी राहू देण्याची ही विनंती हृतिकनं केलीय.”

“मी माझ्या फॅन्सला निराश करु इच्छित नाही, कारण त्यांचा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. माझा सुद्धा लग्नसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी पुन्हा एकदा माझ्या चाहत्यांना धन्यवाद देऊ इच्छितो, की त्यांनी मला प्रेम दिलं आणि माझ्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना केली… धन्यवाद!”

यापूर्वीही सोडलं होतं सुजाननं घर

अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची बायको सुजान खान यांच्यातलं नातं गेल्या काही दिवसापासून बिनसलं होतं. सुजानने काही महिन्यांपूर्वी हृतिकचं घर सोडून आपल्या माहेरी म्हणजेच संजय आणि झरीन खान यांच्या जुहूतल्या बंगल्यात राहायला गेली होती.

हृतिक आणि सुजानमध्ये काही वाद झाल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये पसरली होती. त्यामुळंच आपलं घर सोडून सुजान माहेरी गेली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुजान तिच्या आई-वडिलांच्या घरी राहतेय. मात्र तिचे वडील संजय खान आजारी असल्यामुळं त्यांच्यासोबत ती वेळ घालवतेय, असं तिच्या जवळच्या मित्रांकडून सांगण्यात येतं होतं.

अभिनेता राकेश रोशन यांच्या वाढदिवसाला सुजान तिच्या आईसोबत आली आणि कार्यक्रमानंतर परत माहेरी निघूनही गेली होती. हृतिक आणि सुजानमध्ये सगळं काही नीट आहे. पण ती माहेरी राहायला गेली असल्यामुळं लवकर गेली, असं तिच्या जवळच्या मंडळींकडून सांगण्यात आलंय. शिवाय तिला त्याच दिवशी पॅरिसला जायचं होतं म्हणून ती लवकर निघून गेली, असंही स्पष्ट करण्यात आलं.

हृतिक आणि सुजानमध्ये वाद असल्याची अफवा पसरली होती, ती आता खरी ठरली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, December 13, 2013, 19:48


comments powered by Disqus