Last Updated: Saturday, June 14, 2014, 16:11
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई हृतिक रोशन आणि कतरीना कैफ यांचा ‘बँग बँग’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. नुकताच या सिनेमाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला.
सोशल वेबसाईट यू ट्यूबवरही हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनं केलंय. हा सिनेमा टॉम क्रूझ – कॅमेरुन डियाज यांच्या ‘नाईट अॅन्ड डे’ या सिनेमाचा रिमेक असल्याचं म्हटलं जातंय. हा सिनेमा २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
या सिनेमात हृतिकचा अॅक्शन अवतार पाहायला मिळेल. त्याच्यासोबत कतरीना कैफही या सिनेमात दिसेल. ही जोडी यापूर्वी ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमात पाहायला मिळाली होती आणि प्रेक्षकांना ती भावलीही होती. बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड हा सिनेमा तोडू शकतो, असा अंदाज आत्ताच वर्तवण्यात येतोय.
व्हिडिओ पाहा –
First Published: Saturday, June 14, 2014, 16:10